सिने डान्सर्स असोसिएशनच्या ब्रँड अॅम्बेसेडर सरोज खान नर्तकांच्या मुलींसाठी मोफत शिक्षण उपलब्ध करून देणार
७० वर्षीय नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांना सिने डान्स असोसिएशन(सीडीए) ला फिल्म इंडस्ट्रीची सर्वात मोठी संघटना बनवायची आहे. सिने डान्सर्स असोसिएशनने भारतातील पहिली महिला नृत्यदिग्दर्शक सरोज खान यांना ब्रँडअॅम्बेसेडर म्हणून म्हणून घोषित करत त्यांचा गौरव केला. यावेळी सिने डान्सर्स अससोसिएशन चे अध्यक्ष निलेश पराडकर,अध्यक्ष झाहीद शेख, सरचिटणीस रवी कनवर, डिस्प्युट अध्यक्ष अल फहीम सुरांनी (राज) आणि अन्य अससोसिएशन चे मॅनॅगिंग कंमिट्टी चे सदस्य देखील उपस्थित होते. सिने डान्सर्स असोसिएशनचे अध्यक्ष जाहिद शेख सांगतात की, "सरोज खान यांनी या व्यवसायाला आपल्या आयुष्याची ५० हून अधिक वर्षे दिली आहेत आणि आता त्यांचा सन्मान करण्याची आणि त्यांना त्यांच्या हक्काचे योग्य असे स्थान देण्याची वेळ आली आहे." ७० वर्षीय नृत्यदिग्दर्शक, सरोज खान यांनी त्यांच्या किशोरवस्थेत या क्षेत्रात पदार्पण केले. सीडीएच्या आजच्या निर्णयाने भारावून जात त्या म्हणतात की, "मी अजूनही एक ग्रुप डान्सर आहे आणि माझ्याकडे अद्याप माझे सीडीए कार्ड आहे. ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून मला नावाजले असल्यामुळे, मला (सीडीए) ला ...