अभिनेता - उद्योजक सचिन जोशी ने बीएमसी ला क्वारंटाईनसाठी हॉटेल 'द बिटल' चा प्रस्ताव दिला



स्वयं-वेगळे आणि स्व:ताला क्वारंटाईन करणे ही सध्याच्या काळाची गरज बनली आहे कारण विषारी कोरोनाव्हायरस (कोविड -१९) भारतातील हजारो लोकांना आणि परदेशात लाखोंना प्रभावित करत आहे. २१ दिवसांच्या लॉकडाउनमधून भारत जात असताना, नागरिकांनी हे सिद्ध केले आहे की माणुसकी  अजूनही अस्तित्त्वात आहे! टाटांप्रमाणेच, वायकिंग ग्रुपचे सीएमडी आणि प्रशंसित अभिनेते-उद्योजक सचिन जे. जोशीसुद्धा यासाठी पुढे आले आहेत आणि हातभार लावत आहेत.

बिग ब्रदर फाउंडेशनमागील प्रेरक शक्ती असणारे सचिन जे. जोशी यांना परदेशातून येणा ऱ्या प्रवासी जे कोविड -१९ संक्रमित असतील त्यांना क्वारंटाईन म्हणून येथे ठेवण्यात यावे असा प्रस्ताव दिला गेला आहे. पवईतल्या बीटेल हॉटेल ३६ खोल्यांचे बुटिक हॉटेल आहे.

दुबईत अडकलेल्या सचिन जे. जोशी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, “मुंबई हे एक दाट लोकवस्तीचे शहर आहे, म्हणून आपले शहर वाचवण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी पुरेशी रुग्णालये आणि बेड नाहीत. जेव्हा महापालिकेने मदतीसाठी आमच्याकडे संपर्क साधला तेव्हा आम्ही स्व इच्छेने मदत करण्यास सहमती दर्शविली. ”  अभिनेता-उद्योजक सचिन जे जोशी यांनी अझान या चित्रपटातून बॉलीवूड मध्ये पदार्पण केले होते. यानंतर त्यांनी सनी लिओन बरोबर जॅकपॉट, लिसा रे आणि उषा जाधव यांच्यासह  वीरप्पन यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. नर्गिस फखरी आणि मोना सिंग यांच्यासमवेत अमावस या चित्रपटमध्ये शेवटी दिसलेले. ते म्हणाले, “आम्ही बीएमसीच्या मदतीसाठी आमच्या हॉटेलला प्रवाश्यांसाठी क्वारंटाईन  ठेवण्याच्या सुविधेसाठी रुपांतर केले आहे.”

नियमित तपासणीसाठी नेमलेल्या विशेष डॉक्टर आणि परिचारिकांसह क्वारंटाईन केलेल्यांसाठी महापालिकेने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत तसेच काही मार्गदर्शक सूचना देखील जारी केल्या आहेत. "आवश्यक साधनसामुग्रीसह आणि सुसज्ज स्टाफसह संपूर्ण इमारत, खोल्या नियमितपणे स्वच्छ केल्या जातात."

सचिन असे मानतात फक्त मुंबई किंवा महाराष्ट्रच नाही तर व्हायरसशी लढायला मदत करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. हे फक्त भारतच नाही. हा धोकादायक कोरोनाव्हायरस जगाविरूद्ध उभा आहे. सरकारी कामगार आणि गरीब लोकांना लक्षात ठेवून त्यांची बिग ब्रदर फाउंडेशन गरजू लोकांना अन्नाचे डब्बे  वितरण करीत आहे. क्वारंटाईन काळाच्या समाप्तीपर्यंत फाउंडेशन हे कार्य करत राहील!

मला आनंद आहे की आमचे पवई मधील हॉटेल बीटलविषाणूपासून प्रभावित क्वारंटाईनसाठी बीएमसीला देण्यात आले आहे. हा माझ्या पतीच्या निर्णय आहे आणि मी त्याचा आदर आणि समर्थन करते, ”अशी प्रतिक्रिया नकाब प्रसिद्धीप्राप्त अभिनेत्री आणि सचिन जे जोशी यांची पत्नी उर्वशी शर्मा यांनी दिली. “आम्ही आमच्या हॉटेलमधून सर्व अधिकारी आणि रस्त्यावर अडकलेल्या लोकांना अन्न वितरण करीत आहोत. आमची टीम आता जवळजवळ दोन आठवड्यांपासून नि: स्वार्थपणे हे काम करत आहे आणि आम्ही जोपर्यंत सक्षम आहोत तोपर्यंत आमचा पाठिंबा देत राहू. "  


Comments

Popular posts from this blog

Ajivasan's ACT with Suresh Wadkar, Padma Wadkar, Sonu Nigam, Vijay Prakash et al explores art, commerce and technology of music Ajivasan ACT takes music to newer heights

Varadraj Swami, the write man!

CINTAA STATEMENT