या निवडणूक सत्रासाठी २२ वर्षीय तनिषा अवर्सेकर करणार लोकतंत्रा.इनद्वारे डिजिटल लोकशाहीचा प्रचार

Mohit Bharatiya, Tannisha Avarrsekar, Jayantrao Patil and
 Satyajeet Tambe Patil at the launch of Lokatantra.in
भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असली तरी, हे चित्र स्वातंत्र्यापुर्वी असे नव्हते. भारतात स्वातंत्र्यानंतर १९५० साली जेव्हा  संविधान लागू झाले आणि भारत एक  गणतंत्र राष्ट्र बनले तेव्हापासून आजपर्यंत  भारत जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून ताठ उभे आहे. त्यांनतर प्रथमच भारतीय नागरिकांना मतदान करून आपला लोकप्रतीनिधी निवडण्याचा हक्क मिळाला, आणि वारसाहक्काने मिळणारे पद आता बहुमताने मिळू लागले. आणि निवडणुकांमध्ये उभे राहणाऱ्या उमेद्वारांमधून लोक आपला लोकप्रतिनिधी निवडू लागले.

मतदारयादीत नाव येणे ही एक क्लिष्ट प्रक्रिया आहे, एखादी गोष्ट आपल्याला नीट समजली नाही की माणूस गोंधळात पडतो. ह्या दुर्दैवी फेऱ्यातून सुटण्यासाठी हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. तनिषा अवर्सेकर आपल्यासाठी lokatantra.in नावाची वेबसाईट घेऊन येत आहेत. एक app जे तुमच्या अँड्रॉइड फोनच्या प्ले स्टोअर मधून आणि ऍपल वापरकर्त्यांसाठी app store मधून डाउनलोड करू शकता. सर्व मुंबईकरांसाठी सर्व माहिती एकत्रित असलेले हे अँप शासन आणि राज्यकर्ते ह्यांच्यातील माहितीच्या देवांघेवाणीसाठी एक नवीन माध्यम आहे. आणि ह्या अँप सोबत तुम्ही आपल्या लोकप्रतिनिधींना थेट संपर्क करू शकता.

किंग्स कॉलेज लंडन येथे शिक्षण घेतलेल्या उदारमतवादी पदवीधर तनिषा ह्याचं शिक्षण इंग्रजी भाषा आणि राजकारण ह्यामध्ये झालेलं आहे, तसेंच त्यांनी beyond the horizon आणि journey to freedom ही पुस्तके सुध्दा लिहिलेली आहेत. त्या म्हणतात की, "आम्ही लोकप्रतिनिधी आणि मतदार ह्यांना जोडतो त्यांच्या का, कसं , कुठे , कधी ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो. मतदान प्रक्रियेमध्ये मतदारांना हवी असलेली माहिती  विस्तृत संशोधनाने एकत्रित केलेली आहे जेणेकरून संपूर्ण प्रक्रिया जलद आणि समजायला सोपी व्हावी." तनिशा ह्या संपुर्ण उपक्रमाच्या संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत.

lokatantra.in तुम्हाला मतदानसंबंधी सर्व माहिती, जसे की लोकसभा किंवा विधानसभा ह्यातल्या कोणत्या मतदारसंघाच्या मतदार यादीत तुम्ही समाविष्ट आहात हे खात्रीने सांगू शकते. तसेच तुमचं नाव, कसं, कुठे आणि कधी मतदान करायचं ह्या विषयी सुध्दा माहिती देते. हे अँप उमेदवारांची माहिती, त्यासंबंधीचे व्हिडीओज, लेख अगदी मतदार नोंदणी कुठे करावी इथपासून ते बूथ वर नक्की काय करावे इथपर्यंत सर्व माहिती नवोदित मतदारांना देते.

ह्याचा शुभारंभ मुंबईतील ६ मतदार संघातून केला जातोय.
दक्षिण मुंबई,
मध्य दक्षिण मुंबई,
मध्य उत्तर मुंबई,
उत्तर मुंबई,
उत्तर पूर्व मुंबई,
आणि उत्तर पश्चिम मुंबई

ह्यामध्ये तनिशा नेत्यांना जबाबदार धरून सर्वजनिकपणे सर्वसमावेशक मत सांगते त्याचबरोबर दिलेल्या मताचे सर्वेसर्वा जबाबदार मतदाता स्वतः असतो हेही सांगतात. अठरा ते पंचवीस वयोगटातील नोंदणीकृत मतदारांची संख्या आश्चर्यकारकरित्या फक्त ५९३१०५ एवढीच आहे. त्यानुसार lokatantra.in ने नागरिकांच्या महत्वाच्या समस्यांवर सर्वेक्षण तसेच मतदान घेऊन निकालाचे विश्लेषण केले आहे त्यानुसार उमेदवार निश्चित करायला मदत झाली.
त्या सांगतात की "कोणत्याही पक्षाची, व्यक्तीची किंवा विचारधारेच्या मान्यतेशिवाय आम्ही तुम्हाला वचन देतो की आमची माहिती कायम निष्पक्ष आणि खरी असेल. ज्याची मदत तुम्हाला तुमचा मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी होईल."
ह्यात दुमत नाही की ह्या उपक्रमा साठी सगळीच नेते मंडळी एका मंचा वर येऊन सामान्य जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करत आहेत. तनिषा अवर्सेकर सह अनेक राजकारणी ह्यात सहभागी असणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

Sudesh Bhosale Voices Mard Maratha of Panipat

Governor Shri Bhagat Singh Koshyari inaugurated the Dadasaheb Phalke Icon Award 2020 Trophy.

More Power to Such Crusaders! Audiologist-Speech Therapist Devangi Dalal distributed digital hearing aids to 30 kids this New Year's week