'पांडेजी जरा संभलके' या हिंदी वेबसिरीजमधून झळकणार डिजिटल स्टार सतीश रे!


आजचे शहरी जीवन तणाव आणि संघर्षाने भरलेले आहे. म्हणून आपल्या जीवनात काही विनोदी क्षणांची आवश्यकता असते. अशीच एक कॉमेडी आणि तुम्हाला हसवणारी हिंदी वेबसिरीज 'पांडेजी जरा संभलके' येत आहे तुमच्या भेटीला.  मनोज पांडे (सतीश रे) या एका युवकाच्या आयुष्याभोवती फिरणारी हि वेबसिरीज आहे.



या सिरीजची कथा म्हणजे मनोज पांडे हा आपल्या गर्लफ्रेंड देबोशी (डॉली चावला) हिच्या सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत आहे. त्याला नेहमीच देबोशीसोबत लग्न करायचं आहे , पण अचानक त्याच्या आयुष्यात एक वेगळेच वळण येते आणि त्याला देबोशीची बालमैत्रीण इशिता (कनिका खन्ना) आवडू लागते. त्यात मनोजचा मित्र नरेश (प्रकाश जैस) हा इशिताच्या मागे लागलेला असतो. याच वळणावर अनेक विनोदी प्रसंग घडतात. या चार चौकडीभोवती फिरणारी हि विनोदी कथा नक्कीच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवेल आणि प्रेक्षकांचे मनोरंजन देखील करेल. उल्लेखनीय बाब म्हणजे सतीश रे यांनी याआधी ईनामदार शर्मा, अल्फा पांडे आणि बबन भोला सारख्या अनेक लोकप्रिय भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या शो 'ईनामदार इंटरव्ह्यू' सोबतच भोजपुरी आणि बिहारी लेहेजातील त्यांचा बोलण्याचा अंदाज हा देशभरातील तरुणांना सर्वात जास्त आकर्षित करतो. या सिरीज मध्ये सतीश रे यांचा एक नवीनच अंदाज प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.



'पांडेजी जरा संभलके' या हिंदी वेबसिरीजची निर्मिती गनू दादा आणि अमोल भोसले यांनी केली असून विनय शांडिल्य यांनी या वेबसिरीचे दिग्दर्शन केले आहे. निखिल रायबोले आणि भूपेंद्रकुमार नंदन या दोघांनी मिळून या वेबसिरीजचे लेखन केले आहे.


कॅफे स्टुडिओज प्रोडक्शनच्या बॅनरची 'पांडेजी जरा संभलके' हि हिंदी वेबसिरीज १७ फेब्रुवारीपासून एम.एक्स.प्लेअरवर मोफत पाहता येणार आहे. या सीरिजचे पोस्टर व्हॅलंटाईनस डे च्या दुसऱ्या दिवशी येणार आहे. ठीक अशा वेळी जेव्हा पांडेजीं आपल्या व्हॅलंटाईनच्या मैत्रिणीच्या प्रेमात आकर्षित होत आहेत...

Comments

Popular posts from this blog

Varadraj Swami, the write man!

Sudesh Bhosale Voices Mard Maratha of Panipat

Governor Shri Bhagat Singh Koshyari inaugurated the Dadasaheb Phalke Icon Award 2020 Trophy.