पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला गायिका सानिया सईदने ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी‘ गीताने दिली पर्यावरणाचा संदेश
जागतिक पर्यावरण दिनाच्या आदल्या दिवशी गायिका सानिया सईदने ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी‘ गाणे गात पृथ्वी वाचवण्यासाठी वृक्षारोपण करण्याची गरज असल्याचे सांगत वृक्षारोपण केले.
आर. डी. बर्मन यांनी गुलजार यांच्या गीताने संगीतबद्ध केलेले लता मंगेशकर यांनी गायलेले मूळ गाणे आज वृक्ष आणि वनस्पती यांच्या रुपाने प्रतिध्वनीत दिसत आहेत. आपले भविष्य यावर अवलंबून असल्याने आपल्याला आपले पर्यावरण जपण्याची गरज आहे, असे यावेळी सानियाने बोलताना सांगितले. "मी लताजींच्या आवाजावर मोठी झाली आहे. त्या माझ्या आदर्श आहेत. मी लताजींना मानवंदना देत आहे आणि मला आशा आहे की ती ऐकून त्यांना आवडेल, लाखो लोकांना प्रेरणा देण्याची शक्ती असल्यामुळे मी हे गाणे निवडले." असेही सानिया यावेळी म्हणाली.
Comments
Post a Comment