रोनित रॉयच्या आणि सोमा घोष यांच्या हस्ते परमेश पॉलच्या 'द सॅक्रेड नंदी' प्रदर्शनाचे अनावरण


नामवंत अभिनेता रोनित रॉय आणि पद्मश्री सन्मानित गायिका डॉसोमा घोष यांच्या हस्ते प्रसिद्ध कलाकार परमेश पॉल च्या '  सॅक्रेड नंदीह्या नवीन कलाकृतीचेअनावरण करण्यात आलेपरमेश पॉल यांच्या ह्या नवीन कलाकृतीचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आयोजित करण्यात आले आहेयाप्रसंगी समाजसेवक डॉ.अनिल काशी मुरारकाकलाकार पृथ्वी सोनीगौतम पाटोळेअनन्या बॅनर्जीसमीर मंडलगौतम मुखर्जीविश्वा साहनीअमिषा मेहता आणि संजुक्ता  बरिकयांसारख्या अनेक नामवंतांनी उपस्थिती दर्शविली होती.  

कलाकार परमेश पॉल यांचा आध्यात्मिकतेचा प्रवास त्यांच्या बालपणापासूनच सुरु झालातेव्हापासूनच आध्यात्मिकतेचा अभ्यास म्हणजे त्यांच्यासाठी त्यांची कलाचआहेत्यांच्या कलेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे  प्रत्येक कलाकृतीस मग्न होऊन पाहिल्यास जीवनातील एका सुमधुर लयीचा अनुभव होतो ज्याकारणाने तुम्ही संपूर्णसुष्टिशी एका विशिष्ट भावनात्मक नात्यात बांधले जाता.  

परमेश पॉलच्या कलात्मक प्रवासाची सुरुवात पश्चिम बंगालच्या छोट्याशा नादिया नामक त्यांच्या गावापासून झालीसुरुवातीचे शालेय दिवस त्यांचे पूर्णतः कलेनेव्यापले गेले होतेकुंभाराच्या घरी जन्माला आलेल्या ह्या बालकाने चित्रकलेला आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणांचा भागीदार बनवलेपरमेश पॉल पुढे म्हणाले,  "मीस्वतःच्या प्रयत्नांनी पुढे आलेला कलाकार आहेमाझा हा प्रवास मी आपल्या कुटुंबाबरोबर सुरु केलाआम्ही देवी आणि देवतांचे अद्भुत सुंदर अवताराच्या मुर्त्याघडवायचोपरंतु इस्कॉन मधील वास्त्यव्याने मी रंगांकडे खेचला गेलोमाझे पेंटिंग्स ह्या अध्यात्म आणि निसर्गाची ओढ प्रतीत होण्याऱ्या आहेतत्या प्रत्येकपेंटिंग्सची प्रेरणा भारताच्या वेगवेगळ्या भागात केलेल्या प्रवासातून घेतली गेलेली आहे,  जिथे मी माझ्या स्वतःच्या नवीन नवीन रचना शोधण्याचा प्रयत्न करतअसतोमाझी प्रत्येक कलाकृती जे पाहिलेअनुभवले त्यावर आधारित असते."   

परमेश पॉल म्हणतात, "मी सुरुवातीपासूनच माझ्या कलेशी प्रामाणिक आहेजे मला पटले ते मी कॅनवास वर उतरवलेमंदिरातुन येणाऱ्या सुमधुर भजनांचे आणिवाद्यांचे आवाज ऐकतच मी मोठा झालोनिसर्गाबद्दलचे आकर्षण आणि पवित्र नंदी देवी देवतांचे भव्य वाहन कॅनवासवर रेखाटने म्हणजेच त्यांची पूजा केल्यासारखेआहे असे मी मानतो."

परमेश पॉल यांच्या प्रत्येक चित्रकलेला हिंदू पौराणिक धार्मिक अध्यात्म कथेचा स्पर्श आहे ज्यामुळे त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत एक अस्थिर ऊर्जा  आहेह्याचकारणामुळे  नंदीची चमक आणि पावित्र्य दोन्ही भौतिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या वैभवशाली दिसतात. "जेव्हा माझ्या कलेचे प्रशंसक कौतुक करतात आणिमाझ्या कामाबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी पुढे येतात तेव्हा मी माझ्या आयुष्याचा प्रवास पूर्णतः कलाकार म्हणून पूर्ण करतो असे मला वाटते."

ह्या सोमवारपासून सुरु झालेले हे पेटिंग प्रदर्शन १२ मे २०१९ पर्यंत जहांगीर आर्ट गॅलरी (क्रमांक येथे पाहण्याची संधी आपणांस मिळणार आहे.

Comments

Popular posts from this blog

Ajivasan's ACT with Suresh Wadkar, Padma Wadkar, Sonu Nigam, Vijay Prakash et al explores art, commerce and technology of music Ajivasan ACT takes music to newer heights

Varadraj Swami, the write man!

Sudesh Bhosale Voices Mard Maratha of Panipat